मंत्रीपदावरुन शिवसेनेच्या खासदारांमध्ये नाराजी, एका खासदाराचा फोन ‘नाॅट रिचेबल’ तर एकाने गटनेते पद नाकारले !

मंत्रीपदावरुन शिवसेनेच्या खासदारांमध्ये नाराजी, एका खासदाराचा फोन ‘नाॅट रिचेबल’ तर एकाने गटनेते पद नाकारले !

मुंबई – मंत्रीपदावरुन शिवसेनेच्या खासदारांमध्ये नाराजी असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे एका खासदाराचा फोन ‘नाॅट रिचेबल’ तर एकाने गटनेते पद नाकारले असल्याची माहिती आहे. मंत्रीमंडळात मुंबईतील खासदारांना झुकते माप दिल्याबद्दल शिवसेना खासदारांमध्ये ही नाराजी आहे.
मंत्रीपदाची अपेक्षा असलेल्या एका खासदाराने लोकसभेतील गटनेते पद नाकारले आहे. तर
मुंबईतील खासदाराची मंत्रीपदी वर्णी लागणार असल्यामुळे ज्येष्ठ खासदार नाराज असल्याची माहिती आहे. हे खासदार नेमकं कोण आहेत हे समजू शकलं नाही.

दरम्यान मंत्रीपदावरुन नाराज असलेल्या भावना गवळी यांचा फोन ‘नाॅट रिचेबल’ असून
त्या शपथविधीला उपस्थित राहण्याबद्दल साशंकता आहे. आजच्या शपथविधी सोहळ्यासाठी शिवसेना खासदार दिल्लीत गेले आहेत परंतु भावना गवळी मात्र मुंबईतच आहेत. अद्याप त्या दिल्लीकडे निघाल्या नाहीत. त्यामुळे त्या आजच्या शपथविधी सोहळ्यासाठी जाणार नसल्याची माहिती आहे.

शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील खासदार अरविंद सावंत आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अरविंद सांवत यांचं नाव मंत्रिपदासाठी दिलं आहे. त्यामुळे सावंत हे आपल्या कुटुंबासह दिल्लीत पोहचले आहेत.

COMMENTS