महाशिवआघाडीच्या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री तर 14-14 मंत्री असणार?

महाशिवआघाडीच्या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री तर 14-14 मंत्री असणार?

मुंबई – भाजपनं सत्तास्थापन करण्यास नकार दिल्यानंतर शिवसेना आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत मिळून सत्तास्थापन करण्य़ाच्या मार्गावर आहे. संध्य़ाकाळी 6 वाजता शिवसेनेचे नेते राज्यपालांना भेटण्यासाठी जाणार आहेत. शिवसेनेला आज संध्याकाळी 7.30 वाजेपर्यंत सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी वेळ देण्यात आली आहे. याबाबत शिवसेनेचे नेते काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत. यावेळी काँग्रेसने महाराष्ट्र सरकारमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी 1-1 उपमुख्यमंत्री आणि 14-14 मंत्रीपद असा फॉर्म्युला तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातही दुपारी बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये सरकार स्थापनेबद्दल चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीनंतर राज्यातील महाराष्ट्रातील 6 नेते दिल्लीला पोहोचले आहेत. तर काँग्रेसच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीची देखील एक बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची भूमिका राष्ट्रवादीनं घेतली आहे.

COMMENTS