राज्यात महाशिवआघाडी उदयास येणार, सत्तास्थापनेचा ‘असा’ आहे फॉर्म्युला?

राज्यात महाशिवआघाडी उदयास येणार, सत्तास्थापनेचा ‘असा’ आहे फॉर्म्युला?

मुंबई – भाजपने सत्तास्थापनेस नकार दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.
राज्यपालांनी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असेलल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे.
त्यामुळे राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे महाशिवआघाडीचे सरकार उदयास येणार आहे. सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादीने फॉर्म्युला तयार केला असल्याची माहिती आहे. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद, तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद असेल. तर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना गृहमंत्रीपद मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

दरम्यान आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होत आहे. त्यानंतर शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत. तर शिवसेना खासदार संजय राऊत हेही दिल्लीला जाणार असल्याची आहे. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे महाशिवआघाडीचे सरकार येणार हे निश्चित आहे. त्यामुळे पवारांच्या दिल्लीतील बैठकीकडे लक्ष लागलं आहे .

COMMENTS