आमदार उदय सामंत यांचा राष्ट्रवादीला धक्का, रत्नागिरीतील राष्ट्रवादीचे अनेक नेते शिवसेनेत?

आमदार उदय सामंत यांचा राष्ट्रवादीला धक्का, रत्नागिरीतील राष्ट्रवादीचे अनेक नेते शिवसेनेत?

रत्नागिरी – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर म्हाडाचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक, पदाधिकारी, युवा कार्यकर्ते आणि अल्पसंख्याक नेत्यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली असून ते लवकरच पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे ऐन विधानसभा आणि पालिका नगराध्यक्ष पोटनिवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला हा मोठा धक्का असल्याचं दिसत आहे. यावेळी खासदार अनिल देसाई, उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, पाणी सभापती सोहेल मुकादम, अल्पसंख्याक विधानसभा संघटक जमुरात अल्जी उपस्थित होते.

दरम्यान राष्ट्रवादीचे केतन शेट्ये, वक्रतुंड ऊर्फ मुन्नू शेट्ये, अल्पसंख्याक नेते यासिनमामू कोतवडेकर, शाहजन पटेल, नगरसेवक मुसा काझी, नगरसेवक सोहेल साखरकर यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे आगामी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीतील शहर विकास आघाडीची राजकीय गणित बिघडणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS