शेतकरी आंदोलनास शिवसेनेची पाठ

शेतकरी आंदोलनास शिवसेनेची पाठ

मुंबईः केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी ठाण मांडला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरु आहे. आज मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन होत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आझाद मैदानात आले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मोर्च्याला पाठिंबा दिला असून तेदेखील मोर्चात सहभागी होणार अशी चर्चा होती. मात्र ते किंवा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी पाठ फिरवली.

केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा, करोना काळात राज्य सरकारनं स्थगित केलेली महात्मा फुले कर्ज माफी योजना पुन्हा सुरू करावी, वनाधिकार खात्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत.

या मागण्यांसाठी राज्यभरातील लाखो शेतकरी आझाद मैदानावर एकवटले आहेत. या आंदोलनास महाविकास आघाडीने पाठिंबा दिला होता. यामध्ये शरद पवार, बाळासाहेब थोरात, शेकपाचे आमदार जयंत पाटील आदी नेते सहभागी झाले होते. तसेच शिवसेनाही यामध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा होती. मात्र, शिवसेनेच्यावतीने कोणताही नेता न फिरल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

यावेळी शरद पवार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असताना केंद्र सरकार आणि त्यांच्या भूमिकेवर हल्ला चढवले. जे कायदे करीत असताना चर्चेविना उद्योगपतींच्या हितासाठी बहुमताच्या जोरावर मंजूर केले. तसेच राज्यपालांना शेतकऱ्यांची बाजू समजून घेण्यास वेळ नाही. असे राज्यपाल महाराष्ट्राला पहिल्यांदाच भेटल्याचीही टिका केली.

COMMENTS