राजकीय वातावरण तापलं, शिवसेनेनं आमदारांसाठी मागितली सुरक्षा !

राजकीय वातावरण तापलं, शिवसेनेनं आमदारांसाठी मागितली सुरक्षा !

मुंबई – सत्तास्थापनेवरुन राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून आमदार फुटू नयेत यालाठी शिवसेनेनं आता आणखी एक पाऊल उचललं असल्याचं दिसत आहे. मुंबई पाेलिस आयुक्तांकडे शिवसेनेनं आमदारांसाठी सुरक्षा मागितली आहे. मिलिंद नार्वेकर यांनी याबाबत पाेलीस आयुक्त संजय बर्वेंना पत्र लिहिलं असून यामध्ये त्यांनी 15 नाेव्हेंबरपर्यंत आमदारांसाठी सुरक्षा मागितली आहे.

दरम्यान मातोश्री निवासस्थानी काल झालेल्या बैठकीनंतर शिवसेनेच्या सर्व आमदारांची रंगशारदा हॉटेलमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. पक्षप्रमुखांच्या निवासस्थानापासून हे हॉटेल जवळ आहे. कुठलाही धोका नको म्हणून सर्व आमदारांना रंगशारदा हॉटेलमध्ये हलवण्यात आले आहे. सध्याच्या परिस्थितीत सर्व आमदारांनी एकत्र असणे आवश्यक आहे. उद्धवजींचा जो काही निर्णय असेल तो आम्हाला सर्वांना मान्य आहे असे आमदार सुनील प्रभू काल म्हणाले होते.
त्यानंतरही आज आमदार फुटतील या भीतीने मुंबई पाेलिस आयुक्तांकडे शिवसेनेनं आमदारांसाठी सुरक्षा मागितली आहे.

COMMENTS