भाजपच्या ‘त्या’ ऑफरला शिवसेनेकडून नकार ?

भाजपच्या ‘त्या’ ऑफरला शिवसेनेकडून नकार ?

मुंबई शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदाची भाजपकडून ऑफर दिल्याची चर्चा होती. पण त्या ऑफरला शिवसेनेकडून नकार देण्यात आली असल्याची माहिती आहे. शिवसेना 3 महिन्यासाठी उपमुख्यमंत्रिपद घेणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री पदासाठी भाजपकडून शिवसेनेला ऑफर देण्यात आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण त्यावर आपल्याला कोणतीही ऑफर देण्यात आली नाही अशी माहिती शिवसेनेकडून देण्यात आली. तर आपण फक्त 3 महिन्यासाठी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार नाही अशी स्पष्ट भूमिकाही शिवसेनेकडून घेण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहण्याआगोदर भाजपनं शिवसेनेला ही ऑफर दिल्याचीही चर्चा होती. परंतु भाजपनं ही ऑफर नकारली असल्याची माहिती आहे.जुनच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यावेळीदेखील शिवसेनेतील नेत्यांना मोठी पदं मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवसेनेच्या बड्या नेत्यांना नवी पदं देण्यात येणार आहेत. पण असं असलं तरी उपमुख्यमंत्री पदासाठी शिवसेना उत्सुक नसल्याची स्पष्ट माहिती देण्यात आली आहे.

 

COMMENTS