औरंगजेब हा काही महाराष्ट्र धर्म नाही-शिवसेनेने साधला निशाना

औरंगजेब हा काही महाराष्ट्र धर्म नाही-शिवसेनेने साधला निशाना

मुंबईः ‘सरकारी कागदावर नसेलही, पण राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री असतानाच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर करुन टाकले व जनतेने ते स्वीकारले. त्यामुळं आता संभाजीनगरमुळं महाविकास आघाडीत काही बिघाडी होईल, असे कोणाला वाटत असेल तर ते ठार वेडे आहेत. महाराष्ट्राचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीशी बांधील आहेच. औरंगजेब हा काही महाराष्ट्र धर्म किंवा स्वाभिमानाचे प्रतीक नाही. हे काँग्रेसवालेही मान्य करतील व औरंग्या हा काही सेक्युलरही नव्हता, हे समजून घेतले पाहिजे. असं स्पष्ट करतानाच शिवसेनेने दैनिक सामानातून भाजपवर निशाणा साधला आहे.

औरंगाबाद शहराच्या नामांतरणाच्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. काँग्रेसच्या विरोधानंतर राज्यातील विरोधी पक्ष भाजपने पुन्हा महाविकास आघाडीतील अंतर्गंत वादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. भाजपने केलेल्या या टीकेवर शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून नामांतराबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.

आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसने नामांतरास विरोध केल्याने शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी, असा भाजपचा आग्रह आहे. त्यात भूमिका स्पष्ट करण्याचसारखं काहीच नाही, असे म्हणत शिवसेनेने आपली भूमिका बदललेलीच नसल्याचं तसेच ‘बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वीच जाहीरपणे औरंगाबादचे संभाजीनगर केले आहे. राहिला प्रश्न कागदपत्रांचा त्यावरही लवकरच दुरुस्ती होईल, असे स्पष्ट केले आहे.

COMMENTS