सचिन अहिर यांना पक्षात घेण्यामागे शिवसेनेची आहे ‘ही’ मोठी खेळी?

सचिन अहिर यांना पक्षात घेण्यामागे शिवसेनेची आहे ‘ही’ मोठी खेळी?

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. सचिन अहिर यांचा पारंपरिक मतदार संघ म्हणजे वरळी विधानसभा मतदारसंघ होय. या मतदारसंघातून ते प्रत्येक निवडणूक लढवतात. याठिकाणी त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. अशा परिस्थितीत आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून आगामी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. वरळी विधानसभेतून आदित्य ठाकरे यांना निवडणूक लढता यावं यासाठी शिवसेनेनं अहिर यांना गळाला लावलं असल्याची चर्चा आहे. सचिन अहिर यांचा शिवसेनेत प्रवेश करुन वरळी विधानसभा एक हाती कशी जिंकता येईल यावर शिवसेनेचा भर असल्याचं दिसत आहे. तसेच आदित्य ठाकरे निवडून आल्यास ते मुख्यमंत्रीपदासाठी दावा करतील असंही बोललं जात आहे.

दरम्यान आदित्य ठाकरे यांनी वरळीतून निवडणूक लढवली तर सचिन अहिर हे भायखळ्यातून निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे किंवा अहिर यांना विधानपरिषद दिली जाऊ शकते असंही बोललं जात आहे.
मात्र असं असलं तरी 2014 मध्ये अहिर यांचा पराभव करणारे शिवसेनेचो विद्यमान आमदार सुनिल शिंदे यांचं पुनर्वसन कसं आणि कुठे करणार याबाबतही तर्कवितर्क लावले जात आहेत. तसेच वरळीतून शिवसेनेचा पुढचा आमदार मीच असणार असा दावा सुनिल शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेना वरळीतून नेमकी उमेदवारी कोणाला देणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS