विधानसभा निवडणुकीबाबत संजय राऊत यांचं सूचक विधान !

विधानसभा निवडणुकीबाबत संजय राऊत यांचं सूचक विधान !

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी सूचक विधान केलं आहे. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतील अशा घडामोडी सध्या सुरु असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री आदित्य ठाकरेंसाठी लहान पद आहे. तरुणांचे नेते म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली असून प्रतिष्ठा मिळवली आहे. आदित्य ठाकरे यांच्या कार्यपद्धतीविषयी तरुणांमध्ये एक जबरदस्त आकर्षण आहे. आदित्य ठाकरे महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतील अशा घडामोडी, जडणघडण सध्या सुरु असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. युवासेनेचे पदाधिकारी वरूण सरदेसाई यांनी इन्स्टाग्रामवर यासंदर्भात पोस्ट टाकून आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची मागणी केली होती. त्यानंतर आदित्य ठाकरे निवडणूक लढणार असल्याची शक्यता व्यक्त होती. दरम्यान संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवतील अशी पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.

COMMENTS