बिहार विधानसभा निवडणूक, शिवसेनेची स्टार प्रचारकांची यादी जाहीर, 20 पैकी 12 नेते महाराष्ट्रातील !

बिहार विधानसभा निवडणूक, शिवसेनेची स्टार प्रचारकांची यादी जाहीर, 20 पैकी 12 नेते महाराष्ट्रातील !

मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. कालच राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या स्टार प्रचारक नेत्यांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. 20 नेत्यांची ही यादी असून हे नेते शिवसेनेचा प्रचार करणार आहेत. या नेत्यांमध्ये 12 नेते महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह २० जणांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाकडं ही  यादी सोपवली असून शिवसेना बिहारमध्ये ५० जागा लढवण्याच्या तयारीत आहे.

शिवसेना स्टार प्रचारकांची यादी 

उद्धव ठाकरे

आदित्य ठाकरे

संजय राऊत

सुभाष देसाई

चंद्रकांत खैरे

अनिल देसाई

विनायक राऊत

अरविंद सावंत

राजकुमार बाफना

प्रियांका चतुर्वेदी

राहुल शेवाळे

कृपाल तुमाणे

सुनील चिटणीस

योगराज शर्मा

कौशलेंद्र शर्मा

विनय शुक्ला

गुलाबचंद दुबे

अखिलेश तिवारी

अशोक तिवारी

एकूण २४३ मतदारसंघ असलेल्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ येत्या २९ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे. बिहारमध्ये एकूण तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ७१ मतदारसंघ दुसऱ्या टप्प्यात ९४ मतदारसंघ तर तिसऱ्या टप्प्यात ७८ मतदारसंघात मतदान होणार आहे. पहिला टप्पा मतदानाची तारीख 28 ऑक्टोबर असणार आहे तर, दुसरा टप्प्यातील मतदान 3 नोव्हेंबरला पार पडणार आहे. तिसरा टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबर होणार आहे. तर बिहार निवडणुकीचा निकाल हा 10 नोव्हेंबरला लागणार आहे.

COMMENTS