शिवसेना विधीमंडळ गटनेतेपदी ‘या’ नेत्याची निवड होणार?

शिवसेना विधीमंडळ गटनेतेपदी ‘या’ नेत्याची निवड होणार?

मुंबई – शिवसेना विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्या शिवसेना भवनात हाेणाऱ्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिक्कामाेर्तब हाेण्याची शक्यता आहे. गटनेतेपदासाठी आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा असली तरी तुर्तास अनुभवी एकनाथ शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. शिवसेना आमदारांची बैठक संपल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांच्या नावाची घाेषणा करतील अशी माहिती आहे.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. विधीमंडळ नेत्याची निवड करण्यासाठी भाजपने आज विधीमंडळात सर्व नवनिर्वाचित आमदार 105 आणि भाजप नेत्यांची बैठक बोलावली होती. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विधीमंडळ नेतेपदी निवडीचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला 11 आमदारांनी अनुमोदन दिले. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हेच भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत.

COMMENTS