कमळ पुसुन टाकूया हा निर्धार करूया- उद्धव ठाकरे

कमळ पुसुन टाकूया हा निर्धार करूया- उद्धव ठाकरे

पालघर– पालघरमधील लोकसभेच्या पोटनिवडणुकीबाबत मोखाडा येथे घेण्यात आलेल्या प्रचारसभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजप पक्ष चिंतामण वनगांना विसरला आहे तसेच रामाला देखील विसरला असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच आता निष्ठ राहिला नाही आता थैली दाखवली की पक्षप्रवेश होतो असा जोरदार हल्लाही उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

दरम्यान गरज सरो आणि वैद्य मरो अशी अवस्था भाजपची झाली असेल तर आम्ही तसं नको निष्ठा आणि पैसा अशी ही निवडणूक असल्याच्याही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच कमळ पुसुन टाकूया हा निर्धार करूया असा नाराही यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

COMMENTS