शिवसेना ईशान्य मुंबईतील गटबाजीवर उद्धव ठाकरेंनी काढला तोडगा !

शिवसेना ईशान्य मुंबईतील गटबाजीवर उद्धव ठाकरेंनी काढला तोडगा !

मुंबई – शिवसेना ईशान्य मुंबईतील गटबाजीवर पक्षप्रमुक उद्धव ठाकरे यांनी अखेर तोडगा काढला आहे. विभाग क्रमांक 7 भांडुप-विक्रोळी-मुलुंडच्या विभागप्रमुख पदावर रमेश कोरगावकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. रमेश कोरगावकर स्थानिक ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष असून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून ही घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत गटबाजीच्या वादामुळे शिवसेना ईशान्य मुंबई धुमसत होती. कथित वादग्रस्त ऑडिओ क्लिपमुळे माजी महापौर दत्ता दळवी यांचा उद्धव ठाकरे यांनी विभागप्रमुख पदाचा राजीनामा होता. त्यानंतर मुलुंडमधील पक्षाचे उपविभाग प्रमुख जगदीश शेट्टी आणि शाखाप्रमुख दीपक सावंत यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. तसेच दळवींच्या वादग्रस्त ऑडिओ क्लिपमागे शेट्टी आणि सावंत यांचा हात असल्याची पक्षांतर्गत चर्चा होती. तसंच ईशान्य मुंबईतील महिला पदाधिका-यांमधील मतभेद उद्धव ठाकरेंच्या पुढ्यात चव्हाट्यावर आले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी कोरगावकर यांची विभाग प्रमुख पदावर नियुक्ती केली आहे.

COMMENTS