शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, महिला शिवसैनिकानं भडकावली विभागप्रमुखाच्या श्रीमुखात !

शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, महिला शिवसैनिकानं भडकावली विभागप्रमुखाच्या श्रीमुखात !

मुंबई – शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून महिला शिवसैनिकांनी विभागप्रमुखाच्या श्रीमुखात लगावली असल्याचं समोर आलं आहे. पूर्व उपनगरातील गोवंडी इथं ही घटना घडली असून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरुन हा वाद झाला असल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेत या महिलांनी मारहाण केली असल्याचं समजत आहे.

दरम्यान या महिला शिवसैनिकांनी विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांच्या श्रीमुखात लगावली असून ते कार्यक्रमानिमित्त देवनार याठिकाणी गेले होते. यादरम्यान हा प्रकार घ़डला आहे. त्यावेळी त्यांच्याकडे महिलां कार्यकर्त्यांनी विचारणा केली असता राजेंद्र राऊत मंचावरुन खाली आले. त्यानंतर महिलांनी त्यांना घेराव घातला. त्याचवेळी एका महिलेने वादावादीत राजेंद्र राऊत यांच्या कानशिलात लगावली असल्याचं समोर आलं आहे.

COMMENTS