नाशिक – शिवसेनेला धक्का नगराध्यक्षांसह पदाधिका-यांचा भाजपात प्रवेश !

नाशिक – शिवसेनेला धक्का नगराध्यक्षांसह पदाधिका-यांचा भाजपात प्रवेश !

नाशिक – नाशिकमध्ये शिवसेनेला जोरदार धक्का बसला असून दिंडोरी नगरपंचायत समितीचे नगराध्यक्ष प्रमोद देशमुख यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रमोद देशमुख आणि काही पदाधिका-यांनी नाशिकच्या गोल्फ क्‍लब विश्रामगृहावर पालकमंत्री महाजन, खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, पक्षाचे तालुका अध्यक्ष संजय कावळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.

दरम्यान या पदाधिका-यांच्या प्रवेशामुळे नगरपंचायतीची सत्ता भाजपकडे गेली आहे. त्यामुळे शिवसेनेला जोरदार धक्का बसला असल्याचं दिसत आहे. यावेळी कादवा साखर कारखान्याने माजी संचालक दत्तात्रय जाधव, संतोष देशमुख, भास्कर कराटे यांच्यासह विविध पदाधिका-यांनीही प्रवेश केला आहे. या सर्व पदाधिका-यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला हा मोठा धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे.

 

COMMENTS