आदित्य ठाकरेंना धक्का, वरळी मतदारसंघातील अनेक शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश ! VIDEO

आदित्य ठाकरेंना धक्का, वरळी मतदारसंघातील अनेक शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश ! VIDEO

मुंबई – राज्याचे पर्यटनमंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर नाराज असलेल्या शिवसैनिकांनी मनसेत प्रवेश केला आहे. राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा झाला. आदित्य ठाकरेंना हा धक्का मानला जात आहे.आमदार म्हणून आदित्य ठाकरे वरळीत काहीच काम करत नसल्याने आपण मनसेत प्रवेश करत असल्याचे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान मनसेचे पदाधिकारी संतोष धुरी यांच्या नेतृत्वाखाली राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानावर हा पक्षप्रवेश पार पडला. वरळीमधील सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे आणि इतर नागरिकांनी मनसेत प्रवेश घेतला असल्याची माहिती संतोष धुरी यांनी दिली. आदित्य ठाकरे यांना वरळीकरांनी निवडून दिले. लोकप्रतिनिधी लोकांमधला असावा अशी जनतेची अपेक्षा असते. पण आदित्य ठाकरेंकडून काही महिन्यातच वरळीकरांचा भ्रमनिरास झाला आहे. सध्या कोणतीही निवडूणूक नाही तरीही वरळीतील अनेक नागरिकांनी राज ठाकरेंच्या मनसेला जवळचे मानत प्रवेश केला असल्याचं धुरी यांनी म्हटलं आहे.

COMMENTS