…त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण !

…त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण !

ठाणे  ठाण्यातील शिवसैनिकांमध्ये सध्या नाराजीचं वातावरण पहावयास मिळत आहे. कारण उद्धव ठाकरे परदेश दौ-यावर गेले असताना ठाणे महापालिकेतील विकासकामांचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत. येत्या सात एप्रिलला विकासकामांचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे नसताना देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन केलं जात असल्यानं शिवसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे सध्या आपल्या कुटुंबियांसोबत परदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे उद्धव यांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्री उद्घाटन करणार आहेत. तसेच या कार्यक्रमाची पूर्वकल्पना उद्धव ठाकरेंना दिली नव्हती का? असा संतप्त सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे. सहा एप्रिलला स्थापना दिनानिमित्त भाजप मुंबईत शक्तिप्रदर्शन करणार आहे, तर सात एप्रिलला विकासकामांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं ठाण्यात शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी भाजपनं केली असल्याचं दिसून येत आहे.

COMMENTS