शिवसेनेला मंत्रिमंडळ विस्तारात दोन मंत्रिपदं, ‘या’ नेत्यांची वर्णी लागणार?

शिवसेनेला मंत्रिमंडळ विस्तारात दोन मंत्रिपदं, ‘या’ नेत्यांची वर्णी लागणार?

मुंबई – राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या सकाळी 11 वाजता राजभवन येथे होणार आहे. या मंत्रिमंडळ वास्तारात शिवसेना- भाजपमधील नव्या नेत्यांना संधी दिली जाणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला दोन मंत्रिपदं दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद दिले जाणार असून जयदत्त क्षीरसागर यांना कॅबिनेट मंत्रीपद तर अनिल परब, तानाजी सावंत किंवा राजेश क्षीरसागर यांना राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान भाजपकडून अमरावतीचे आमदार अनिल बोंडे यांचे नाव विस्तारात निश्चित करण्यात आले आहे, तर औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे भाजप आमदार अतुल सावे यांचेही नाव निश्चित करण्यात आले आहे. तसेच रामदास आठवले यांच्या रिपाइंलाही एक मंत्रिपद देण्यात येणार आहे.

दरम्यान मंत्रिमंडळ फेरबदल करतांना भाजपमध्ये काही मंत्र्यांना डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये राज्यमंत्री विद्या ठाकूर, प्रवीण पोटे यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. तसेच गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनाही डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्याबरोबर गडचिरोलीचे पालकमंत्री अंबरिश आत्राम यांनाही डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हे सर्व मंत्री आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा देतील अशी चर्चा आहे.

COMMENTS