लोकसभेसाठी शिवसेना दिवाळीपर्यंत करणार उमेदवार जाहीर, यांच्या नावाची चर्चा !

लोकसभेसाठी शिवसेना दिवाळीपर्यंत करणार उमेदवार जाहीर, यांच्या नावाची चर्चा !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं स्वबळाची तयारी सुरु केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज घेण्यात आलेल्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली असल्याची माहिती आहे. राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 48 जागांवर शिवसेना निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे. लोकसभा निवडणुकीसाठी दिवाळीपर्यंत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. या निवडणुकीसत विद्यमान 19 खासदारांना पुन्हा संधी दिली जाणार असून मुंबईचे महापौर विश्वसनाथ महाडेश्वर, माजी महापौर शुभा राऊळ, शिवसेनेच्या नेत्या निलम गो-हे यांना या निवडणुकीत संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान मुंबईतील सर्वच म्हणजेच लोकसभेच्या सहा जागांवरही शिवसेनेचा उमेदवार उभा केला जाणार असल्याची दाट शक्यता असून सध्या मुंबईत शिवसेनेचे तीन आणि भाजपचे तीन खासदार आहेत. त्यामुळे भाजपच्या तीन खासदारांचा सामना करण्यासाठी शिवसेनेतून अनेक नावं पुढे येत आहेत. उत्तर पूर्व मुंबईत भाजपच्या पुनम महाजन यांच्याविरोधात आरोग्यमंत्री दीपक सावंत आणि विश्वनाथ महाडेश्वर यांच्या नावाची चर्चा आहे. तर उत्तर मुंबईत भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात शुभा राऊळ आणि उद्योगमंत्री सुभाष देशमुख यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तर इशान्य पूर्व मुंबईत भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात निलम गो-हे आणि शिशिर शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे.

COMMENTS