शिवस्मारक प्रकल्पाचे काम आणखी रखडणार, काम थांबवण्याचे  सार्वजनिक बांधकाम विभागाचे आदेश !

शिवस्मारक प्रकल्पाचे काम आणखी रखडणार, काम थांबवण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे आदेश !

मुंबई – सार्वजनिक बांधकाम विभागानं शिवस्मारक प्रकल्पाच्या कंत्राटदाराला ताबडतोब काम थांबवण्याचे लेखी आदेश दिले आहेत. त्यामुळे शिवस्मारक प्रकल्पाचे काम आणखी रखडण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने स्थगितीचे तोंडी आदेश दिल्याचे सरकारी वकिलाने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्राद्वारे कळविले आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कारवाईकेली असून यामुळे पर्यावरणवाद्यांच्या याचिकेचा राज्य सरकारला मोठा फटका बसला असल्याचंं दिसत आहे.

दरम्या शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी या अनुषंगाने आज सकाळी 11 वाजता शिवस्मारक प्रकल्प कार्यालयात तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये शिवस्मारकाच्या कामाला दिलेल्या स्थगितीबाबत चर्चा करण्यात आली. राज्य सरकारची भूमिका सुप्रीम कोर्टात मांडण्यासाठी काय पावलं उचलावीत याबाबतही चर्चा करण्यात आली असल्याची माहिती आहे.

COMMENTS