श्रीगोंदा नगरपालिकेवर भाजपचं वर्चस्व, नगराध्यक्ष मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा !

श्रीगोंदा नगरपालिकेवर भाजपचं वर्चस्व, नगराध्यक्ष मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा !

अहमदनगर – श्रीगोंदा नगरपालिकेवर भाजपचं वर्चस्व पहायला मिळत आहे. परंतु नगराध्यक्षपद मात्र काँग्रेसकडे गेलं आहे.एकूण १९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपनं ११ जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला आठ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. तर शिवसेना-भाजपनं ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती. परंतु या निवडणुकीत शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही.

शुभांगी पोटे

दरम्यान या निवडणुकीत बहुमतासाठी १० जागांची आवश्यकता होती. भाजपनं बहुमतापेक्षा एक जागा जास्त जिंकत नगरपालिकेवर वर्चस्व मिळवलं आहे. मात्र, भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीता शिंदे यांचा तब्बल दीड हजार मतांनी पराभव झाला असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार शुभांगी पोटे नगराध्यक्षपदावर विजयी झाल्या आहेत. शुभांगी पोटे या पूर्वी भाजपमध्येच होत्या. मात्र, ऐनवेळी पक्षांतर करून त्यांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळवली होती.

COMMENTS