उद्या पार्थचा नाही तर पवार घराण्याचा पराभव होणार -श्रीरंग बारणे

उद्या पार्थचा नाही तर पवार घराण्याचा पराभव होणार -श्रीरंग बारणे

पुणे – उद्या पार्थचा नाही तर पवार घराण्याचा पराभव होणार असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे मावळमधील खासदार आणि लोकसभेच उणएदवार श्रीरंग बारणे यांनी केलं आहे. तसेच विजय मिळावा म्हणून कोणत्याही देवाला नवस केलेला नाही. पण मी दीड लाख मतांनी निश्चित विजयी होणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तसेच निवडणूक निकालाबाबत मला कसलाही सभ्रम नाही. मी टेन्शन घेणारा नाही, तर टेन्शन देणारा माणूस आहे, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे यांच्यात चुरशीची लढत पहायला मिळाली आहे. पार्थ पवार हे पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीनं बारणे यांचा पराभव करण्यासाठी सर्वस्वी ताकद पणाला लावली आहे. राज्यातील राष्ट्रवादीचे दिग्गज नेत्यांनी पार्थ पवारांसाठी प्रचारसभा घेतल्या. या निवडणुकीचा उद्या निकाल लागणार आहे. परंतु या निकालापूर्वी आपलाच विजय होणार असल्याचा विश्वास श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे बारणे यांचा हा आत्मविश्वास खरा ठरणार का? हे उद्या स्पष्ट होणार आहे.

COMMENTS