भाजपला मोठा धक्का, सिल्लोड नगरपालिकेवर काँग्रेसची एकहाती सत्ता !

भाजपला मोठा धक्का, सिल्लोड नगरपालिकेवर काँग्रेसची एकहाती सत्ता !

औरंगाबाद – सिल्लोड नगरपालिकेमध्ये भाजपला जोरदार धक्का बसला असून या नगरपालिकेत काँग्रेसनं बाजी मारत एकहाती सत्ता मिळवली आहे. 26 पैकी एकूण 24 जागांवर काँग्रेसनं विजय मिळवला आहे. तसेच काँग्रेसच्या राजश्री निकम या नगराध्यपदाच्या निवडणुकीतही विजयी झाल्या आहेत. राजश्री निकम यांनी भाजपचे अशोक तायडे यांचा 11 हजार मतांनी पराभव केला आहे. त्यामुळे या नगरपालिकेवर आता काँग्रेसचा झेंडा फडकला आहे.

दरम्यान काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्त्वाखाली या निवडणुकीत काँग्रेसनं विजय मिळवला आहे. अब्दुल सत्तार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी 9 तर नगरसेवकपदासाठी 104 उमेदवार रिंगणात होते. रावसाहेब दानवे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सत्ता परिवर्तनासाठी चांगलाच जोर लावला होता. परंतु त्यांना याठिकाणी जनतेनं नाकारलं असल्याचं दिसत आहे.

COMMENTS