सिंधुदुर्गमध्ये भाजपला धक्का, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष करणार काँग्रेसमध्ये प्रवेश!

सिंधुदुर्गमध्ये भाजपला धक्का, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष करणार काँग्रेसमध्ये प्रवेश!

सिंधुदुर्ग – भाजपला जोरदार धक्का बसला असून जिल्हा प्रवक्ता काँग्रेसमध्ये प्रवे करणार असल्याची माहिती आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, भाजपचे जिल्ह्या प्रवक्ता जिल्हा नियोजन समिती सदस्य काका कुंडाळकर हे काँग्रेसवासी होणार आहेत.त्यामुळे कुंडाळकर यांच्या रुपाने भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान 2014 मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुंडाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
काका कुंडाळकर हे पूर्वी कट्टर राणे समर्थक होते.त्यानंतर आता त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. तसेच राज्यात गेली काही दिवसांपासुन भाजपमध्ये गळती सुरू झाली असल्याचं दिसत आहे. त्यामुळे ही गळती रोखण्यासाठी पक्षश्रेष्ठी काय करणार हे पाहणही गरजेचं ठरणार आहे.

COMMENTS