गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मातृशोक !

गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मातृशोक !

अहमदनगर – राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मातोश्री सिंधूताई बाळासाहेब विखे पाटील यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्या 85 वर्षांच्या होत्या. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे त्यांचे वास्तव्य होते.अतिशय मनमिळावू व धार्मिक व्यक्तिमत्त्व असा त्यांचा लौकिक होता.

सिंधुताई विखे पाटील यांच्या पश्चात जागतिक आरोग्य संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. अशोक विखे पाटील, माजी विरोधी पक्षनेते आणि सध्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रवरा मेडिकल युनिव्हर्सिटीचे प्रो-चान्सेलर डॉ. राजेंद्र विखे पाटील अशी तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंड असा परिवार आहे. याचसोबत त्या अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या आजी होत्या. तसंच जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या सासू होत्या. त्यांच्या निधनाने लोणी शहर व परिसरात शोककळा पसरली आहे.

COMMENTS