शिवसेना सरकारमधून बाहेर पडली तर राष्ट्रवादीची भूमिका, काँग्रेस – राष्ट्रवादीचे संबंध, भाजपसोबतची मैत्री आणि 2019 ची निवडणूक, सर्व विषयांवर प्रफुल्ल पटेल काय म्हणाले ?  

शिवसेना सरकारमधून बाहेर पडली तर राष्ट्रवादीची भूमिका, काँग्रेस – राष्ट्रवादीचे संबंध, भाजपसोबतची मैत्री आणि 2019 ची निवडणूक, सर्व विषयांवर प्रफुल्ल पटेल काय म्हणाले ?  

कर्जत – राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसांच्या चिंतन शिबीराला आज सकाळी रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये सुरूवात झाली. यावेळी बोलताना पक्षाचे सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांनी विविध विषयांवर आपली मते व्यक्त केली. तसंच 2019 मध्ये काँग्रेस सोबत आघाडी करण्याचे संकेतही दिले.

2014 च्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढली असती तर 125ते 140 जागा निवडून आल्या असत्या असा दावा करत काँग्रेससोबत आपलं शस्त्रुत्व नाही पण काँग्रेससोबतचे संबंध कभी खुशी कधी गम असे आहेत असंही पटेल यांनी सांगितलं. देशाच्या राजकारणात भाजप विरोधात जे वातावरण तयार झालेलं आहे ते पाहता आपल्याला खुल्या मनाने काम करावं लागेल असंही पटेल म्हणाले.

लोकसभा आणि विधानसभा एकत्र निवडणुक लागेल असं भाकितही प्रफुल्ल पेटल यांनी केलं. त्यासाठी पक्षाचा ठोस कार्यक्रम ठरला पाहिजे. या कार्यक्रमावर सगळ्यांनी काम केलं पाहिजे असंही पटेल म्हणाले. 1999 साली राष्ट्रवादीला वाजपेयींना एनडीएमध्ये येण्याचा आ्ग्रह केला होता. तेव्हा अनेक धर्मनिरपेक्ष पक्ष एनडीएमध्ये गेले. त्यावेळी राष्ट्रवादी एनडीएमध्ये गेली असती तर पवारांना तेव्हा दोन नंबरचे स्थान मिळाले असते. पण तरीही आम्ही एनडीएसोबत गेलो नाही. मग आताच संभ्रम का निर्माण केला जातोय असा सवाल पटेलांनी केला. राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येही हा संभ्रम आहे. तो त्यांनी काढून टाकावा असं आवाहनही पटेल यांनी केलं. शिवसेना सरकारमधून बाहेर पडली तर राष्ट्रवादी भाजपला मदत करणार नाही असंही पटेल यांनी स्पष्ट केलं.

भाजपा – शिवसेना हे आपले विरोधक आहेत. पवार साहेबांनी मोदींना सर्टिफिकेट दिलेले नाही. पवारांनी मोदींची स्तुती केली नाही,मोदी स्वतः येऊन बोलतात असा दावाही पटेल यांनी केला.

COMMENTS