पालघर पोटनिवडणूक – स्मृती इराणींचा आज रोड शो !

पालघर पोटनिवडणूक – स्मृती इराणींचा आज रोड शो !

पालघर  पालघर पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. या निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये जोरदार चुरस पहायला मिळत आहे. भाजपने उत्तर भारतीयांची मतं खेचण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, अभिनेता आणि खासदार मनोज तिवारी यांच्यासह अनेक उत्तर भारतीय नेत्यांना पालघरच्या मैदानात उतरवलं आहे. त्यामध्ये आता केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांचाही समावेश झाला आहे.स्मृती इराणी आज डहाणू भागात भाजपचा प्रचार करणार असून दुपारी स्मृती इराणी रोड शो करणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान आज उद्धव ठाकरे यांची पालघर शहरात दुसरी जाहीर सभा होणार आहे. काल उद्धव ठाकरेंनी पालघर मतदारसंघाचा ग्रामीण भाग पिंजून काढला होता. त्यानंतर आता समुद्र किनारी भागातील मतदारांसाठी प्रचार सभा घेणार आहेत.पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आता शेवटचे दोन दिवस उरले आहेत. या पोटनिवडणुकीसाठी लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाकडून काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा,काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपाकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार मैदानात आहेत.

COMMENTS