राजकारणातील निवृत्तीबाबत स्मृती इराणींचं मोठं वक्तव्य!

राजकारणातील निवृत्तीबाबत स्मृती इराणींचं मोठं वक्तव्य!

नवी दिल्ली – राजकारणातून निवृत्ती घेण्याबाबत केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणीयांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान मोदी राजकारणातून बाजूला होतील त्या दिवशी मीदेखील निवृत्त होईन, अशी घोषणा स्मृती इराणी यांनी केली आहे. गुजरातमध्ये राज्यसभेची उमेदवारी देत नरेंद्र मोदी यांनी मला खासदार केले. प्रारंभी मनुष्यबळ विकासमंत्री आणि आता वस्त्रोद्योगमंत्री अशी महत्त्वाची जबाबदारी सोपविली. त्यामुळे मोदी राजकारणातून बाजूला होतील त्या दिवशी मीदेखील निवृत्त होणार असल्याचं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आगामी लोकसभा निवडणूक अमेठी मतदारसंघातून लढविण्याबाबत पक्षाध्यक्ष अमित शहा घेतील तो निर्णय मान्य असेल, असे सूचक विधानही त्यांनी केले आहे. तसेच काँग्रेसवरही त्यांनी जोरदार टीका केली आहे. चार पिढय़ा मतदारसंघातील शेतकऱ्यांकडे ज्यांनी बघितले नाही ते देशातील शेतकऱ्यांचे काय भले करणार, अशी माव न घेता टीका त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केली आहे.

COMMENTS