सोशल कनेक्ट च्या माध्यमातून आमदारांचे सोशल मिडिया वर थेट जन संवाद !

सोशल कनेक्ट च्या माध्यमातून आमदारांचे सोशल मिडिया वर थेट जन संवाद !

नागपूर – सध्या नागपूर येथे महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे.  या निमित्ताने महाराष्ट्रातील सोशल मिडिया युजर्स व जनतेला त्यांच्या मतदारसंघातील आमदारांशी थेट सोशल मीडियावर संवाद साधता यावा याकरिता MLA E-OFFICE  च्या वतीने सोशल मिडिया – सोशल कनेक्ट या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे . आमदारांना त्यांनी केलेल्या विकासकामाची माहिती सोशल मिडिया वर व्हायरल करण्याची संधी, जनतेला थेट प्रश्न विचारण्याची संधी , कार्यकर्त्यांचा सोशल मीडियाबद्दल असलेला उत्साह व थेट एक लक्ष पेक्षा जास्त सोशल मिडिया युजर्स पर्यंत पोहचण्याची नामी संधी या द्वारे आमदारांना मिळत आहे .

जर तुम्हाला सुद्धा तुमच्या आमदारासोबत सोशल मिडिया वर थेट संवाद साधण्याची प्रतीक्षा असेल तर लवकरच तुम्हाला हि संधी प्राप्त होऊ शकते . या करिता आपल्या आमदारांच्या सोशल मिडिया पेजेस ला सतत फॉलो करत रहा व सकारात्मक प्रश्नांची यादी तयार ठेवा .

COMMENTS