सोशल मीडियावर पंतप्रधानांसह मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीविरोधात अश्‍लील टिपणी, आरोपीस अटक !

सोशल मीडियावर पंतप्रधानांसह मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीविरोधात अश्‍लील टिपणी, आरोपीस अटक !

मुंबई – सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नीविरोधात अश्‍लील टिपणी केली असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती आहे. अनिकेत पाटील असं या आरोपीचं नाव असून जूहू पोलिसांनी अनिकेत पाटील नावाच्या मुलाला अटक केली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून  पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर अश्‍लील टिपणी करण्यात आली होती. या प्रकरणी दोघांविरोधात अश्‍लील शिवीगाळ करणे, तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देणे, आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत पाटील या एका आरोपीला जूहू पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास ते करत आहेत.

COMMENTS