काँग्रेस, राष्ट्रवादीला दणका, “या” जिल्हा बँकेचं संचालक मंडळ बरखास्त !

काँग्रेस, राष्ट्रवादीला दणका, “या” जिल्हा बँकेचं संचालक मंडळ बरखास्त !

मुंबई – सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलंय. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार राज्य सरकारनं ही कारवाई केली आहे. संचालक मंडळ बरखास्त करुन तिथे जिल्हा निबंधक देशमुख यांची प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आली आहे. या जिल्हा बँकेची मोठ्या प्रमाणात थकबाकी झालेली आहे. त्यामुळे बँकेचा एनपीए मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

ही जिल्हा बँक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. गेल्या पाच सहा महिन्यांपासून या बँकेवर कारवाईची टांगती तलवार होती. मात्र बँकेकेतील सत्ताधारी मंडळींनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संधान बांधून कारवाई लांबवली होती अशीची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. ही कारवाई करुन सहकारी मंत्री सुभाष देशमुख यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिल्याचं बोललं जातंय.

COMMENTS