सोलापूर महापालिका पोटनिवडणुकीत काँग्रेसचा झेंडा !

सोलापूर महापालिका पोटनिवडणुकीत काँग्रेसचा झेंडा !

सोलापूर – काँग्रेस नगरसेवकाच्या मृत्यूमुळे जाहीर झालेल्या महापालिका पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदारानं बाजी मारली आहे. काँग्रेसचे उमेदवार तोफिक हत्तुरे हे तब्बल 1700 मतांनी विजयी झाले आहेत. या निवडणुकीत 9 उमेदवार रिंगणात होते. काँग्रेससह, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, भाजप, शिवसेना या पक्षांसह विविध 8 पक्षांचे तर 1 अपक्ष असे 9 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत भाजप आणि एमआयएम वगळता सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

काँग्रेस सोबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएमच्या मुस्लिम उमेदवारांमुळे मुस्लिम मतदारांमध्ये फूट पडले आणि त्याचा फायदा भाजप किंवा शिवसेनेच्या उमेदवाराला होईल असा अंदाज बांधला जात होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएमच्या उमेदवाराला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे काँग्रेसनं ही जागा राखण्यात यश मिळवलं.

COMMENTS