सोलापुरात सहकारमंत्र्यांचं पॅनल पराभवाच्या छायेत, तर बार्शीत राष्ट्रवादी भाजप यांच्यात जोरदार चुरस !

सोलापुरात सहकारमंत्र्यांचं पॅनल पराभवाच्या छायेत, तर बार्शीत राष्ट्रवादी भाजप यांच्यात जोरदार चुरस !

सोलापूर – सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सुरावातीच्या कलांमध्ये पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या सर्वपक्षीय पॅनलने आघाडी घेतली आहे. तर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे पॅनल पराभवाच्या छायेत आहे. सर्वपक्षीय पॅनलचे उमेदवार 200 ते 500 मतांनी आघाडीवर आहेत. या निकालाकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. कारण भाजपचे दोन मंत्री एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यात सामना होतो आहे. सुभाष देशमुख यांनी स्वतंत्र पॅनल तयार करुन या निवडणुकीत रणशिंग फुंकले आहेत. तर सर्वपक्षीय पॅनलमधून पालकमंत्री विजयकुमार देशमुख आपले नशीब अजमावत आहेत. या सर्वपक्षीय पॅनलमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांचा समावेश आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

दुसरीकडे जिल्ह्यात महत्वाची बाजार समिती म्हणून गणल्या जाणा-या बार्शी कृषी उत्पन्न समितीचाही निकाल आज लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री दिलीप सोपल आणि भाजपचे नेते माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या पॅनलमध्ये ही लढत होत आहे. दोन्ही नेत्यांनी ही निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. अगदी गावागावत जाऊन दोन्ही नेत्यांची प्रचाराची राळ उठवली होती. आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालिम म्हणून या निवडणुकीकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS