माजी मंत्री तानाजी सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी होणार ?

माजी मंत्री तानाजी सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी होणार ?

मुंबई – शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांची पक्षातून हकालपट्टी होणार असल्याची चर्चा आहे. सोलापूर आणि उस्मानाबादमधील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला आले आहेत. उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत आमदार तानाजी सावंत यांची पक्षातील हकालपट्टीबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आमदार तानाजी सावंत हटाव, यासाठी सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे या बैठकीत नेमका काय निर्णय होतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखोरी करत भाजपला साथ दिली. पक्षविरोधी कारवाई केल्याने सोलापूर शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांच्या हकालपट्टीनंतर आता तानाजी सावंत यांचीही शिवसेनेतून हकालपट्टी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सावंत यांच्याबाबत उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS