बार्शी नगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर, विरोधकांची टीका !

बार्शी नगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर, विरोधकांची टीका !

सोलापूर – बार्शी नगरपालिकेने बधवारी २०१८-१९ चा १५३ वा अर्थसंकल्प सादर केला आहे. बार्शी नगरपालिकेचे नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांनी हा अर्थसंकल्प सभाग्रहात सादर केला. २०३ कोटी, 18 लाख, 61 हजार 83 रुपयांचा हा अर्थसंकल्प सादर केला असून कुठलीही दरवाढ, करवाढ न करता लोकाभिमुख अर्थसंकल्प सादर केल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा आहे. सत्ताधाऱ्यांचे नेते राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हा अर्थसंकल्प तयार केला असून बर्शिकारांच्या मागण्याचा प्राधान्याने विचार केला असून अमृत योजनेंतर्गत भुयारी गटार व हरित क्षेत्र विकास,प्रधान मंत्री आवास योजना,पारधी आवास योजना व शहराचं ग्रामदैवत भगवंताच्या नावाने भगवंत महोत्सव याकडे अर्थसंकल्पात प्रामुख्याने लक्ष केंद्रीत केल्याचं नगराध्यक्षांनी सांगितलं.

जनतेचा विश्वासघात करणारा अर्थसंकल्प -विरोधक

हा अर्थसंकल्प जनतेला दिलेल्या आश्वासनांचा पडलेला विसर,जनतेचा विश्वासघात केलेला,बोलबच्चन,झोलबच्चन अर्थसंकल्प असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. हा शिलकी अर्थसंकल्प नसून तुटीतील अर्थसंकल्प आहे. असा अर्थसंकल्प सादर करणे कायद्याने चुकीचं आहे. तसेच नगरपालिकेने करवाढ दरवाढ न करता उत्पन्न वाढीसाठी काहीही तरतूद केली नाही त्यामुळे विकास निधीसाठी पैसा कुठून येणार असा सवाल राष्ट्रवादीचे विरोधीपक्ष नेते नागेश अक्कलकोटे यांनी केला आहे. आकडे फुगवून केलेल्या अवास्तव अर्थसंकल्प असल्याची टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी विरोधात मतदान केले.

सन २०१८ -१९ अर्थसंकल्पातील ठळक बाबी

१)अमृत योजनेंतर्गत भुयारी गटार :-११२.४० कोटी

२)अमृत योजनेंतर्गत हरित क्षेत्र विकास:- ४.५० कोटी

३)वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत भगवंत मैदान pavilion  बांधणे:- ४.५० कोटी

४)वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत बाग विकसित करणे ,मल्टीपर्पज हॉल बांधणे ,

  सुभाष नगर कॉम्प्लेक्स बांधणे : ४ कोटी

५) लोकशाहीर आण्णाभाऊ साठे योजनेंतर्गत शहरातील रस्त्यांचा विकास करणे :- १०.०० कोटी

६) जिल्हा नरोत्थान योजनेंतर्गत शहरातील रस्त्यांचा विकास करणे :- ८.०० कोटी

७) प्रधान मंत्री आवास योजना ,पारधी आवास योजना :- १ कोटी (प्रत्येकी)

८) अंध व अपंग कल्याणकारी योजना :- २५ लाख  

९) भगवंत महोत्सव :- १० लाख

 

COMMENTS