मोदी सरकार म्हणजे ‘अंधेरी नगरी चौपट राजा’, सोनिया गांधींची जोरदार टीका!

मोदी सरकार म्हणजे ‘अंधेरी नगरी चौपट राजा’, सोनिया गांधींची जोरदार टीका!

नवी दिल्ली – काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मोदी सरकार म्हणजे अंधेरी नगरी चौपट राजा असल्याची टीका सोनिया गांधी यांनी केली आहे. काँग्रेस मागे हटणार नाही. संविधान वाचविण्याचं काम करणार. काळा पैसा कुठे गेला ? याची चौकशी करायला पाहीजे. सरकारच्या कंपन्या कोणाला विकल्या जात आहेत ? मागील दशकात एवढी बेरोजगारी नव्हती. आर या पार निर्णय घ्यावा लागणार असल्याचं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. दिल्लीतल्या रामलीला मैदानावर झालेल्या देश बचाओ रॅलीमध्ये त्यांनी ही टीका केली आहे.

विना चर्चा कोणतेही विधेयक पारीत केले जात आहे. दररोज संविधान संपवलं जातेय. चुकीच्या निर्णयानं उद्योग बुडाले. तरूण नोकरीच्या शोधात आहेत. आपला देश असे भेदभाव होऊ देणार नाही. मोदी शाह यांचे लक्ष्य आहे. लोकांमध्ये वाद लावून मुख्य मुद्दे लपवण्यावर भर दिला जात आहे. परंतु आम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी कोणतीही कुर्बानी देणार असल्याचंही सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.

COMMENTS