काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधींनी केलं नितीन गडकरींचं कौतुक!

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधींनी केलं नितीन गडकरींचं कौतुक!

नवी दिल्ली –  लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान आज खुद्द काँग्रेच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन  गडकरींच्या कामाचं कौतुक केलं आहे.  प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना नितीन गडकरी यांनी त्यांच्या मंत्रालयाशी संबंधीत प्रश्नोत्तराच्या वेळी जोरदार टोलेबाजी केली. आकडेवारी सादर करत किती मोठं काम झालं याचं चित्र त्यांनी उभं केलं. तसेच भाजपचा मी असा मंत्री आहे जो सर्वच पक्षांच्या खासदारांची काम करतो त्यामुळे सगळ्यांनी माझ्या मंत्रालायाच्या कामाचं कौतुक केलं असल्याचंही यावेळी गडकरी यांनी म्हटलं आहे.

यावेळी भाजपचे मध्य प्रदेशचे खासदार गणेश सिंग अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनीही गडकरींच्या कामाचं कौतुक केलं. त्यानंतर सगळ्याचं खासदारांनी बाकं बाजवून त्यांचं स्वागत केलं. यात सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांचाही समावेश होता.गडकरी बोलत असताना सोनिया गांधी सकारात्मक मान हलवून त्यांना प्रतिसादही देत होत्या. सोनिया गांधी यांनी गडकरींच्या कामाचं कौतुक केल्यामुळे राजकीय वर्तुळात  चर्चा रंगली आहे.

COMMENTS