काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी घेतली विरोधी पक्षांची बैठक, शरद पवारांनी मांडले ‘हे’ मुद्दे!

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी घेतली विरोधी पक्षांची बैठक, शरद पवारांनी मांडले ‘हे’ मुद्दे!

नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव, एमके स्टालिन यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांनी उपस्थिती लावली होती. या बैठकीच्या सुरुवातीला अम्फान चक्रीवादळामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. केंद्र सरकारने अम्फान चक्रीवादळाला तातडीने राष्ट्रीय आपत्ती घोषित करा, तसेच या चक्रीवादळचा फटका ज्या राज्यांना बसला आहे, त्यांना आर्थिक मदत द्या, अशी मागणी यात करण्यात आली.

दरम्यान या बैठकीच्या सुरुवातीला अम्फान चक्रीवादळामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. केंद्र सरकारने अम्फान चक्रीवादळाला तातडीने राष्ट्रीय आपत्ती घोषित करा, तसेच या चक्रीवादळचा फटका ज्या राज्यांना बसला आहे, त्यांना आर्थिक मदत द्या, अशी मागणी यात करण्यात आली आहे.सोनिया गांधींसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही मुद्दे मांडले आहेत. पंतप्रधानांनी विरोधकांची फक्त एकच बैठक घेतली, पण आणखी बैठका घेणं अपेक्षित होतं.

उद्योग क्षेत्राच्या पुनरुज्जीवनावर भर दिला जाणं आवश्यक आहे. स्थलांतरित मजुरांचा प्रश्न आणि बेरोजगारीचं संकट गंभीर आहे. शैक्षणिक क्षेत्राचं मोठं नुकसान होतं आहे. शिक्षण संस्थाही अडचणीत आल्या आहेत, त्यामुळे यावर उपाययोजना करण्यासाठी एका शिक्षण समितीची गरज असल्याचंही पवार म्हणाले आहेत.

COMMENTS