राज्यात अनेक ठिकाणी एसटी बस वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल !

राज्यात अनेक ठिकाणी एसटी बस वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल !

मुंबई – राज्यामध्ये एसटी बस कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपामुळे राज्यभरातील प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. पुणे बस स्थानकात सकाळी ७ पर्यंत बसेस सुटल्या होत्या परंतु आता सगळ्या बसेस स्थानकातच उभ्या असल्याचं पहावयास मिळालं आहे. तर बाहेरून येणा-या बसेसही याठिकाणी थांबल्या आहेत. तसेच या संपाचा भंडारामध्ये सकाळपासूनच प्रभाव पाहायला मिळत आहे. रात्रकालीन बसेस पहाटे 6.30 पर्यंत भंडारा स्थानकावरून निघाल्या त्यानंतर मात्र नियमीत बस सेवा पूर्णपणे थांबली असल्याचं पहावयास मिळालं आहे.  रात्री अचानक संप पुकारल्याने प्रवशांना या विषयी माहिती नव्हती. त्यामुळे प्रवासी स्थानकावर आल्यावर त्यांची चांगलीच तारांबळ उडत असल्याचं पहावयास मिळत आहे.

दरम्यान एसटीच्या अधिकाऱ्यांनी आमची प्रवासाची सोय करावी अशी मागणी प्रवासी करीत आहेत, आता सकाळची वेळ असल्याने प्रवासी कमी आहेत मात्र नंतर प्रवासी अजून वाढतील तेव्हा त्यांच्या त्रास मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तर आम्हाला सर्व मागण्या मंजूर आहेत मात्र ज्यामध्ये जी धमकी दिली आहे की वेत वाढ मंजूर नसल्यास राजीनामा द्यावा. अशा धमक्या आम्ही खपवून घेणार नाहीत आणि नवीन लोकांना अजून वेतनवाढ द्यावी आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हा संप असाच सुरु राहणार असल्याचा इशारा एसटी कर्मचा-यांच्या संघटनेनं दिला आहे.

COMMENTS