चालक, वाहक पदासाठी प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना एसटी महामंडळाकडून संधी !

चालक, वाहक पदासाठी प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना एसटी महामंडळाकडून संधी !

मुंबई – एसटी महामंडळामातर्फे सन 2017 मध्ये कोकणातील 6 जिल्ह्यांसाठी 7929 चालक तथा वाहक पदासह, सहाय्यक, लिपीक व पर्यवेक्षक इत्यादी सुमारे 14000 पदाकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यापैकी सुमारे 9000 उमेदवार विविध पदावर प्रशिक्षणांती नियुक्त झाले असून, काही उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू आहे. तथापि, 8 व 9 जुन 2018 रोजी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या अघोषित संपामध्ये यापैकी केवळ एक-दोन महिने कामावर रूजू झालेल्या 1010  कर्मचाऱ्यांनी भाग घेतल्याने त्यांची सेवा समाप्त केली आहे.त्यांच्याऐवजी प्रतीक्षा यादीवरील 503 उमेदवारांना तातडीने सोमवार आजपासून चालक तथा वाहक प्रशिक्षणासाठी महामंडळातर्फे बोलवण्यात येणार आहे.

तसेच याच भरतीमधील जे उमेदवार लेखी परिक्षा उत्तीर्ण होऊन, कागदपत्रातील किरकोळ त्रुटीमुळे भरती पक्रियेतून बाद झाले होते, त्यांना सदर कागदपत्रांची दुरूस्ती करून त्यापैकी पात्र उमेदवारांना वाहन चालक चाचणीसाठी बोलविण्यात आले आहे. याबरोबरच लेखी परिक्षा   उत्तीर्ण होऊन वाहन चालक चाचणीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पुनश्च वाहनचालक चाचणीसाठी बोलवण्यात येणार आहे. या प्रक्रियेतून एसटी महामंडळास सुमारे 1500 चालक तथा वाहक प्राप्त होणार असल्याची माहिती एसटी महामंडळानं दिली आहे.

 

COMMENTS