दुसऱ्या दिवशीही एसटी बंद ! कामावर रुजू व्हा..अन्यथा निलंबन,प्रशासनाचा इशारा

दुसऱ्या दिवशीही एसटी बंद ! कामावर रुजू व्हा..अन्यथा निलंबन,प्रशासनाचा इशारा

मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत संप पुकारला आहे.  यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून तब्बल 24तासांहूनही अधिक काळ उलटला आहे. अजूनपर्यंत कर्मचारी कामावर परतलेले नाहीत, कामावर लवकर रुजू न झाल्यास निलंबनाची कारवाई करून निलंबित कर्मचाऱ्यांच्या जागेवर कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येईल, असा इशारा एसटी प्रशासनाने दिला आहे.
या कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर सातवा वेतन आयोग लागू करावा, पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी, तसेच जोवर कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही, तोपर्यंत कर्मचारी, कामगारांना २५ टक्के हंगामी वाढ देण्यात यावी. या मागण्यांना घेऊन हा राज्यव्यापी संप पुकारला आहे. यामुळे दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.

यावर बोलताना ‘आणखी 25 वर्षे एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केलाच जाऊ शकत नाही. यासाठी महामंडळाकडेच मुळात पैसाच नाही, असे विधान परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले होते. एवढेच नाही तर या संपामागे काँग्रेसचा हात असल्याचेही ते म्हणाले होते.

 

COMMENTS