आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय !

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय !

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शेतक-यांचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्यास मदत होणा-या जळगावमधील तीन तर औरंगाबादमधील एका पाझर तलावाच्या कामास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.

 आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय  

1) शेतीच्या आधुनिकीकरणासाठी शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरणारी 100 टक्के राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना 2018-19 पासून राबविण्यास मान्यता.

2) शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्यास महत्त्वाच्या ठरु शकणाऱ्या जळगावमधील तीन तर औरंगाबादमधील एका पाझर तलावाच्या कामास प्रशासकीय मंजुरी.

3 ) मुंबईतील बॉम्बे पशुवैद्यकीय महाविद्यालय बॉम्बे (Bombay Veterinary college, Bombay) या महाविद्यालयाचे नाव बदलून मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई असे करण्यास मान्यता.

COMMENTS