मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय !

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय !

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील विविध योजनांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण निर्णय खालीलप्रमाणे…

1) पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी बालेवाडी (ता. हवेली) येथील 5 हेक्टर 60 आर इतकी शासकीय जमीन देण्यास मान्यता.

2) मुंबई महानगर प्रदेशातील महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रातील जमीन दरांना 19 मे ते 19 सप्टेंबर 2017 दरम्यान देण्यात आलेल्या स्थगिती कालावधीतील व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क वसुलीस मान्यता. मात्र, व्याज आकारणी नाही.

3) सहकारी गृहनिर्माण संस्थांना सुलभ व अनुरूप नियम लागू करण्यासाठी  महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा.

4) उमरेड (जि. नागपूर) येथील क्रीडा संकुलासाठीचे आरक्षण वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यास मान्यता.

COMMENTS