मंत्रिमंडळाची बैठक पडली पार, बैठकीत महत्त्वाचे निर्णय !

मंत्रिमंडळाची बैठक पडली पार, बैठकीत महत्त्वाचे निर्णय !

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत राज्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. दरम्यान काही महत्त्वाचे निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आले आहेत.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

१ – थेट निवडणुकीने निवडण्यात आलेल्या नगराध्यक्षांना विशेष अधिकार देण्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम-1965 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता.

२ –  न्यायालयीन वाद प्रकरणांची प्रलंबितता कमी करण्यासाठी दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता.

३ – मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर तांत्रिक संवर्गातील प्रबंधक व उपप्रबंधक (माहिती तंत्रज्ञान) संवर्गातील प्रत्येकी एका पदाची निर्मिती करण्यास मान्यता.

४ –   महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम-2016 मध्ये दुरुस्तीसंदर्भातील अध्यादेश पुनर्प्रख्यापित करण्यास मान्यता.

५ –   खिदमतमाश जमिनींचा कालानुरूप वापर करणे शक्य होण्यासाठी हैदराबाद अतियात चौकशी अधिनियम-1952 च्या कलम 6 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता.

 

COMMENTS