राज्य निवडणूक आयोगाची मान्यता प्राप्त 14 राजकीय पक्षांना नोटीस !

राज्य निवडणूक आयोगाची मान्यता प्राप्त 14 राजकीय पक्षांना नोटीस !

मुंबई – राज्य निवडणूक आयोगाने मान्यता प्राप्त 14 राजकीय पक्षांना नोटीस बजावली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये केलेल्या खर्चाचा तपशील सादर न केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबतची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे.

दरम्यान  राज्य निवडणूक आयोगाच्या 15 ऑक्टोबर 2016 च्या आदेशान्वये राजकीय पक्षांना निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासंदर्भात वेगवेगळ्या माध्यमातून राजकीय पक्षांना सूचीतही करण्यात आले होते.  परंतु पक्षांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपली नोंदणी रद्द का करण्यात येऊ नये, अशी नोटीस आता बजावण्यात आली आहे.यामध्ये सर्व पक्षांनी 10 मार्च 2019 पर्यंत खर्चाचा तपशील सादर करण्याचा आदेश दिला आहे.

या राजकीय पक्षांना बजावली नोटीस

भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय जनता पार्टी, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), बहुजन समाज पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, ऑल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लिमीन आणि जनता दल (युनायटेड), शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जनता दल (सेक्युलर), समाजवादी पार्टी, ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कझगम, लोकजनशक्ती पार्टी.

COMMENTS