राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामरक्षक दल स्थापन होणार !

राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामरक्षक दल स्थापन होणार !

मुंबई – राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे अहमदनगर जिल्हयात 116 ग्रामपंचायतींमध्ये ग्रामरक्षक दलाची स्थापना झाल्यानंतर आता राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीत ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यात येणार आहे. यासंदर्भात शासनाने संपूर्ण राज्यात ग्रामरक्षक दले स्थापन करण्यास अधिसूचना जारी केली आहे. गावांमधील अवैध दारु रोखण्यासाठी व गावातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी ग्रामरक्षक दल स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

दारुबंदी सुधारणा अधिनियम, 2016 नुसार व अधिनियमातील तरतुदीनुसार ग्रामरक्षक दलाची स्थापना, रचना, कर्तव्ये, जबाबदारी ठरविण्यात आली असून या तरतुदीनुसार प्रायोगिक तत्वावर अहमदनगर जिल्ह्यात ग्रामरक्षक दल स्थापना करण्याची कृती प्रत्यक्षात अंमलात आणली आहे. अहमदनगर जिल्हयात 1351 ग्रामपंचायतीपैकी 607 ग्रामपंचायतीत ग्रामरक्षक दल स्थापनेसाठी ग्रामसभा झाल्या आहेत. यापैकी जिल्हयातील 557 ग्रामपंचायतींचे प्रस्ताव प्राप्त झाले असून 116 ग्रामपंचायतींमध्ये ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यात आली आहे.

COMMENTS