सरकारनं 2017 मध्ये केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेचं सत्य, आश्वासन काय दिले होते आणि वस्तुस्थिती काय आहे ?

सरकारनं 2017 मध्ये केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेचं सत्य, आश्वासन काय दिले होते आणि वस्तुस्थिती काय आहे ?

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतक-यांसाठी जून 2017 मध्ये ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा केली होती. या घोषणेमध्ये 34 हजार कोटींची शेतक-यांना कर्जमाफी देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. याचा लाभ 89 लाख शेतक-यांना मिळणार होता. परंतु मुख्यमंत्र्यांनी केलेली या घोषणेला वर्ष संपलं असलं तरी 50 टक्के शेतक-यांना याचा लाभच मिळाला नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची 34 हजार कोटींची घोषणा फक्त कागदोपत्रीच असल्याचा आरोप आता विरोधकांनी केला आहे.

दरम्यान 34 हजार कोटींची कर्जमाफीत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारनं शेतक-यांपुढे काही निकष लावले होते. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. या ऑनलाई अर्जांच्या पडताळणीत ज्या शेतक-यांची माहिती जुळली नाही त्यांचे अर्ज बाद करण्यात आले. यामुळे अनेक शेतक-यांना वंचित रहावे लागले आहे.

तसेच कर्जमाफीसाठी राज्यातील जवळपास 89 लाख शेतक-यांपैकी 80 लाख शेतक-यांनी अर्ज केले होते. याचा फक्त 40 लाख 18 हजार शेतक-यांना लाभ मिळाला आहे. या शेतक-यांना जवळपास 16 हजार 600 कोटींची कर्जमाफी देण्यात आली आहे. परंतु आणि 50 टक्के शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत आहेत.

कर्जमाफीची घोषणा करुन दीड वर्ष संपलं तरी फक्त 50 टक्के शेतक-यांना याचा लाभ झाल्यामुळे शेतक-यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तर सरकारची ही ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा खोटारडी असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

COMMENTS