राज्य सरकारचा नाकर्तेपणा उघड, 50 टक्केही निधी खर्च नाही !

राज्य सरकारचा नाकर्तेपणा उघड, 50 टक्केही निधी खर्च नाही !

मुंबई – राज्य सरकारचा नाकर्तेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. कर्जमाफीच्या नावाखाली सरकारने राज्यातील विकासकामांना कात्री लावली परंतु कात्री लावूनही उरलेला निधी खर्च केला नसल्याचं समोर आलं आहे. अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या निधीपैकी फक्त ३८ टक्केच निधीच खर्च केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अर्थसंकल्पात सर्व विभागांसाठी ३ लाख ६९ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत १ लाख ४२ हजार कोटी रक्कम विविध विभागांनी खर्च केला असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपा युतीचे सरकार सत्तेवर आल्यापासून मागील तीन वर्षातील खर्चाचा हा निचांक आहे. २०१५-१६ या अर्थसंकल्पातील ५८.६१ टक्के, २०१६-१७ या वर्षाच्या अर्थसंकल्पातील ५६.३० टक्के रक्कम खर्च झाली होती. तर २०१७-१८ या चालू वर्षात १० महिन्यात केवळ ३८ टक्के रक्कम खर्च केला आहे. सर्वात कमी रक्कम खर्च करणार्‍या पहिल्या तीन विभागांमध्ये गृहनिर्माण विभाग – ४.४१  टक्के, सार्वजनिक बांधकाम विभाग – ८.४ टक्के तर तिसर्‍या स्थानावर जलसंधारण विभाग – ९.७  टक्के रक्कम खर्च केला आहे. त्यामुळे राज्य सरकारचा नाकर्तेपणा पुनहा उघड झाला आहे.

COMMENTS