पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारच्या अडचणीत वाढ !

पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारच्या अडचणीत वाढ !

मुंबई – पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं दिसत आहे.
ताडदेव मिल कंपाऊंड एसआरए घोटाळ्याप्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर लोकायुक्तांनी ताशेरे ओढले आहेत. प्रकाश मेहता यांनी याप्रकरणी मदत केल्याचं निरीक्षण लोकायुक्तांनी नोंदवलं आहे. ताडदेव मिल कंपाऊंडमध्ये एसआरएला परवानगी देताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा प्रकाश मेहता यांच्याकडून मारण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र मुख्यमंत्र्यांना अवगत करण्यात आलं नसल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान याप्रकरणी प्रकाश महेता यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘मंत्र्यांनी आता जनाची नाही तर मनाची लाज ठेवावी,’ असा घणाघातही धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्यामुळे याविषयावरुन आता पावसाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक पवित्रा घेणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS